महाराष्ट्र

“राजकारणात खळबळ! शरद पवारांची प्रकृती खालावली, ताफा पुण्याकडे रवाना”

“राजकारणात खळबळ! शरद पवारांची प्रकृती खालावली, ताफा पुण्याकडे रवाना”

बारामती (प्रतिनिधी) : राज्यभरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांची लगबग सुरू असताना ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबाबत चिंताजनक माहिती समोर आली आहे. अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना बारामतीतील गोविंदबाग निवासस्थानातून पुण्याकडे उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सोमवारी दुपारच्या सुमारास शरद पवार यांना खोकला व कफाचा त्रास वाढल्याने तसेच श्वास घेण्यास अडचण जाणवल्याने डॉक्टरांचे पथक तातडीने गोविंदबागेत दाखल झाले. सुमारे तासभर वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पुढील उपचारांसाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.

यानंतर कार्डियाक अॅम्ब्युलन्ससह ताफा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवार मास्क लावून स्वतंत्र वाहनातून पुण्याकडे निघाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या आरोग्याविषयी अधिकृत वैद्यकीय बुलेटिन अद्याप जाहीर करण्यात आलेले नसले, तरी डॉक्टरांकडून आवश्यक ती काळजी घेतली जात असल्याचे समजते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!