राजकारण

“सुनेच्या विजयानंतर जल्लोषाचा कळस; सुनेच्या आनंदात सासरे लंगोटावर नाचले, व्हिडिओ व्हायरल”

“सुनेच्या विजयानंतर जल्लोषाचा कळस; सुनेच्या आनंदात सासरे लंगोटावर नाचले, व्हिडिओ व्हायरल”

पुणे (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद निवडणुकीत सुनेच्या विजयाचा आनंद साजरा करताना देवराम लांडे यांनी केलेल्या अनोख्या जल्लोषाची सध्या परिसरात मोठी चर्चा रंगली आहे. विजयाचा निकाल जाहीर होताच समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष सुरू केला. याच वेळी देवराम लांडे यांनी उत्साहाच्या भरात पारंपरिक लंगोट परिधान करून बेभान नृत्य केल्याचे दृश्य उपस्थितांनी मोबाईलमध्ये कैद केले असून ते सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या सुनेने विजय संपादन केल्यानंतर कुटुंबीय व समर्थकांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले. गावात मिरवणूक काढण्यात आली, फटाके वाजविण्यात आले तसेच घोषणाबाजी करण्यात आली. या जल्लोषादरम्यान देवराम लांडे यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी अनोख्या पद्धतीने नृत्य केले.

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर काहींनी याला कौटुंबिक आनंदाचा स्वाभाविक उत्स्फूर्त क्षण म्हटले, तर काहींनी सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे जल्लोष करणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया दिली. दरम्यान, स्थानिक प्रशासनाकडून या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत कारवाई करण्यात आलेली नसल्याचे समजते.

या घटनेमुळे विजयाच्या आनंदात व्यक्त होणाऱ्या वेगवेगळ्या पद्धतींबाबत चर्चा सुरू झाली असून, देवराम लांडे यांच्या अनोख्या जल्लोषाने संपूर्ण जिल्ह्यात लक्ष वेधून घेतले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!