क्राईम

चेहरा ओळखू न येण्याइतका भीषण अपघात; मोबाईलच्या कॉलवरून मृताची ओळख

चेहरा ओळखू न येण्याइतका भीषण अपघात; मोबाईलच्या कॉलवरून मृताची ओळख

सोलापूर (प्रतिनिधी):- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मद्रे–आहेरवाडी मार्गावरील कोरे वस्ती परिसरात शुक्रवारी (दि. ७) पहाटे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमनाथ हिरू चव्हाण (वय २५, रा. मद्रे, ता. दक्षिण सोलापूर) असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ चव्हाण हे गुरुवारी रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. दरम्यान मद्रे–आहेरवाडी रस्त्यावरील धोकादायक वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्यांचा भीषण अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघात इतका गंभीर होता की मृत तरुणाचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झाल्याने सुरुवातीला त्यांची ओळख पटविणे कठीण झाले.

दरम्यान, मृताच्या खिशात असलेल्या मोबाईलवर आलेल्या कॉलमुळे ओळख पटण्यास मदत झाली. मद्रे गावचे पोलीस पाटील अनिल हक्के यांनी मोबाईलवर संपर्क साधून खात्री केल्यानंतर मृताची ओळख सोमनाथ चव्हाण अशी निश्चित करण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच वळसंग पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल एस. व्ही. कुवर व त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत सोमनाथ यांना सोलापूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

सोमनाथ चव्हाण यांच्या पश्चात आई-वडील, बहीण व भाऊ असा परिवार असून त्यांच्या अकाली मृत्यूने मद्रे गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून अपघाताचा अधिक तपास सुरू आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!