Prabuddha Raj

Latest Marathi News

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर

Oplus_16908288

सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर

५ फेब्रुवारीला मतदान; १६ जानेवारीपासून आचारसंहिता लागू

सोलापूर (प्रतिनिधी):- राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांनी मंगळवार दि. १३ जानेवारी २०२६ रोजी पत्रकार परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ चा कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात दि. १६ जानेवारी २०२६ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली असून दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात १ जिल्हा परिषद (६८ निवडणूक विभाग) आणि ११ पंचायत समित्या (१३६ निर्वाचक गण) यासाठी ही निवडणूक होत आहे.

*निवडणूक कार्यक्रम (संक्षेप)*

* नामनिर्देशन दाखल : १६ ते २० जानेवारी

* अंतिम स्वीकृती : २१ जानेवारी

* छाननी : २२ जानेवारी

* उमेदवारी माघार : २३, २४ व २७ जानेवारी

* अंतिम यादी व चिन्ह वाटप : २७ जानेवारी

* मतदान : ५ फेब्रुवारी

* मतमोजणी : ७ फेब्रुवारी

* अधिसूचना प्रसिद्ध : १० फेब्रुवारीपर्यंत

*तालुका–निहाय मतदारसंख्या व मतदान केंद्रे*

* करमाळा पंचायत समिती

मतदान केंद्रे : 244
एकूण मतदार : 2,08,023
करमाळा तालुक्यात ग्रामीण भागाचे प्राबल्य असल्याने येथे मतदानाची टक्केवारी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

* माढा पंचायत समिती

मतदान केंद्रे : 269
एकूण मतदार : 2,58,714
जिल्ह्यातील एक मोठा मतदारसंघ असून राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा तालुका आहे.

* बार्शी पंचायत समिती

मतदान केंद्रे : 256
एकूण मतदार : 2,14,754
शहरी–ग्रामीण मिश्र मतदारसंघ असल्याने येथे चुरशीची लढत अपेक्षित आहे.

* उत्तर सोलापूर पंचायत समिती

मतदान केंद्रे : 97
एकूण मतदार : 88,992
शहरी भागाचा प्रभाव अधिक असलेला तालुका आहे.

* मोहोळ पंचायत समिती

मतदान केंद्रे : 220
एकूण मतदार : 1,98,338
कृषीप्रधान तालुका असून विकासकामांवर मतदानाचा कल ठरणार आहे.

* पंढरपूर पंचायत समिती

मतदान केंद्रे : 309
एकूण मतदार : 2,85,826
तीर्थक्षेत्र व मोठी मतदारसंख्या असल्याने जिल्ह्यातील महत्त्वाचा तालुका.

* माळशिरस पंचायत समिती

मतदान केंद्रे : 363
एकूण मतदार : 3,18,281
जिल्ह्यातील सर्वाधिक मतदारसंख्या असलेला तालुका.

* सांगोला पंचायत समिती

मतदान केंद्रे : 274
एकूण मतदार : 2,62,367
दुष्काळी भागातील प्रश्न येथे निवडणुकीत केंद्रस्थानी राहणार.

* मंगळवेढा पंचायत समिती

मतदान केंद्रे : 189
एकूण मतदार : 1,69,536

* दक्षिण सोलापूर पंचायत समिती

मतदान केंद्रे : 247
एकूण मतदार : 2,23,367

* अक्कलकोट पंचायत समिती

मतदान केंद्रे : 290
एकूण मतदार : 2,31,029

*जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या*

पुरुष : 12,77,061
महिला : 11,82,083
इतर : 83
एकूण : 24,59,227 मतदार

यापैकी 38,909 दुबार मतदार असून त्यांनी कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार याबाबत हमीपत्र घेतले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

*वेबकास्टिंग व ईव्हीएम व्यवस्था*

* 2,758 मतदान केंद्रांपैकी 1,379 केंद्रांवर वेबकास्टिंग

* 7,500 BU व 3,366 CU ईव्हीएम यंत्रे

* सर्व यंत्रे पोलीस बंदोबस्तात स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित

सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रातील सर्व पात्र नागरिकांनी निर्भयपणे मतदान करून आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावावे, असे आवाहन मा. कुमार आशीर्वाद (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी सोलापूर यांनी केले आहे.