महाराष्ट्र

मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानाचा आढावा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर झेडपीला भेट

मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानाचा आढावा; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची सोलापूर झेडपीला भेट

सोलापूर (प्रतिनिधी) :- राज्यातील ग्रामविकास योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मंगळवारी सोलापूर जिल्हा परिषदेचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध प्रकरणांच्या सुनावण्या घेतल्या तसेच मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानाच्या अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतला.

Oplus_16908288

जिल्हा परिषदेच्या सभागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून मंत्री गोरे यांनी संबंधित प्रकरणांची सुनावणी घेतली. यानंतर मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध योजनेअंतर्गत सोलापूर जिल्हा परिषदेने केलेल्या कामाचे सादरीकरण वेबसाईटवरील थेट प्रसारणाद्वारे त्यांनी पाहिले. अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेताना त्यांनी गुणवत्तेवर आणि लोकसहभागावर भर देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या.

यावेळी ग्रामसमृद्ध अभियानाच्या जनजागृतीसाठी आयोजित करण्यात आलेल्या शिवलीलाताई पाटील यांच्या कीर्तनाचे व्हिडिओ मंत्री गोरे यांनी विशेष लक्षपूर्वक पाहिले. अशा सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Oplus_16908288

अभियानाच्या सद्यस्थितीबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी सविस्तर माहिती सादर केली. यावेळी प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तसेच जलजीवन मिशनचे अमोल जाधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री ग्रामसमृद्ध अभियानाला अधिक गती देण्यासाठी नियोजनबद्ध अंमलबजावणी, प्रभावी नियंत्रण व सातत्यपूर्ण लोकसहभाग आवश्यक असल्याचे मंत्री गोरे यांनी यावेळी स्पष्ट केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!