Prabuddha Raj

Latest Marathi News

अकलूज फेस्टिवलमध्ये मंगलाताई बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळाचा दणदणीत जल्लोष; प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

Oplus_16908288

अकलूज फेस्टिवलमध्ये मंगलाताई बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळाचा दणदणीत जल्लोष; प्रेक्षकांचा उस्फूर्त प्रतिसाद

सोलापूर (प्रतिनिधी):- अकलूज फेस्टिवलच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला मंगलाताई बनसोडे लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या कार्यक्रमाला अकलूजसह परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत लोककलेवरील आपले प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित केले. कार्यक्रमस्थळी झालेली प्रचंड गर्दी आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मंगलाताई बनसोडे भावूक झाल्या.

Oplus_16908288

लोकनाट्य तमाशातील सादरीकरण, संवादफेक, नृत्य आणि संगीताने उपस्थितांची मने जिंकली. पारंपरिक लोककलेला आधुनिक सादरीकरणाची जोड देत कलाकारांनी सादर केलेल्या कलाप्रकारांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. संपूर्ण कार्यक्रमात प्रेक्षकांचा उत्साह कायम राहिला होता.

या यशस्वी कार्यक्रमानंतर मंगलाताई बनसोडे यांनी अकलूज फेस्टिवलच्या आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करत धवलसिंह मोहिते-पाटील यांचे विशेष आभार मानले. अकलूज फेस्टिवलसारख्या उपक्रमांमुळे लोककलेला हक्काचे व्यासपीठ मिळत असून कलाकारांना प्रोत्साहन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा सांस्कृतिक उपक्रमांमुळे लोककला जिवंत राहून नव्या पिढीपर्यंत पोहोचते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

एकूणच अकलूज फेस्टिवलमधील हा कार्यक्रम लोककलेच्या जतन आणि संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरला असून नागरिकांनीही अशा उपक्रमांना भविष्यात अधिकाधिक पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा आयोजकांकडून व्यक्त करण्यात आली.