महाराष्ट्र

एमपीएससी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जाती उमेदवारांना ‘बार्टी’कडून ₹१० हजारांचे आर्थिक सहाय्य

एमपीएससी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण अनुसूचित जाती उमेदवारांना ‘बार्टी’कडून ₹१० हजारांचे आर्थिक सहाय्य

मुंबई (प्रतिनिधी):- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने राज्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आर्थिक सहाय्य योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) अभियांत्रिकी मुख्य परीक्षा २०२४ मध्ये उत्तीर्ण होऊन मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांना या योजनेअंतर्गत एकरकमी १०,००० रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बार्टीकडून करण्यात आले आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महाराष्ट्रातील अनुसूचित जाती प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. तसेच दि. १३ नोव्हेंबर २०२५ रोजी जाहीर झालेल्या ०५४/२०२५ या अधिसूचनेनुसार एमपीएससी अभियांत्रिकी मुख्य परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन असून, अर्ज करण्यासाठी बार्टीकडील https://forms.gle/nkVisRmndp2qAM9 या लिंकवर फॉर्म व आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज सादर करावेत.

योजनेविषयी अधिक माहितीसाठी 020-26333330 / 26333339 या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या सहाय्यामुळे मुलाखत प्रक्रियेसाठी उमेदवारांना आर्थिक दिलासा मिळून त्यांची तयारी अधिक सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!