महाराष्ट्र

दहावीच्या परीक्षेच्या अर्ज भरण्यास १७ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ!

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या मार्च २०२६ च्या दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. नियमित विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन पद्धतीने शाळा प्रमुखांमार्फत अर्ज भरण्याची मुदत आता १७ नोव्हेंबर २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, असे मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

या मुदतवाढीमुळे अद्याप अर्ज न भरू शकलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शाळा प्रमुखांनी या तारखेपूर्वी सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन सबमिट करावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे.

तसेच, पुनर्परीक्षार्थी, खाजगी विद्यार्थी (ज्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे), श्रेणीसुधार योजना, तुरळक विषय, तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे (ITI) ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थी यांचे अर्जही प्रचलित पद्धतीनुसार त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत भरावयाचे आहेत.

या सर्व अर्जांची प्रक्रिया मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mahahsscboard.in
या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने पूर्ण केली जाणार आहे.

मंडळाने स्पष्ट केले आहे की, विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी दिलेली हीच अंतिम मुदत आहे, आणि या तारखेनंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. त्यामुळे सर्व शाळांनी आणि विद्यार्थ्यांनी अंतिम तारखेपूर्वी अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या तारखा

विलंब शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम तारीख: १७ नोव्हेंबर २०२५

अर्ज संकेतस्थळ: www.mahahsscboard.in

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!