साप्ताहिक ‘सोलापूर देवांग संदेश’च्या रौप्य महोत्सवानिमित्त अक्कलकोट येथे भव्य वधू–वर मेळावा
साप्ताहिक ‘सोलापूर देवांग संदेश’च्या रौप्य महोत्सवानिमित्त अक्कलकोट येथे भव्य वधू–वर मेळावा
२८ डिसेंबरला मोफत नोंदणी; महाराष्ट्र, कर्नाटक,आंध्र-तेलंगणातून समाजबांधवांचा सहभाग
सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर येथून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक ‘सोलापूर देवांग संदेश’ वृत्तपत्राच्या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने हटगार कोष्टी समाजासाठी एक भव्य आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असा वधू–वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा हटगार कोष्टी समाज फाउंडेशन, सोलापूर, हटगार शिवाचार्य फाउंडेशन तसेच अव्वा आप्पा छत्रछाया वीरशैव लिंगायत वृद्धाश्रम, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे.
हा वधू–वर मेळावा रविवार, दि. २८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता
स्थळ – श्री सद्गुरू रेवणसिध्द शिवशरण स्वामी मठ, वागदरी रोड, अक्कलकोट येथे संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या मेळाव्यासाठी नोंदणी पूर्णपणे मोफत ठेवण्यात आली आहे.
या वधू–वर मेळाव्याचा उद्देश समाजातील युवक–युवतींना योग्य स्थळांची ओळख करून देणे, विवाह प्रक्रियेत पारदर्शकता निर्माण करणे तसेच समाजात ऐक्य, सुसंवाद आणि परस्पर सहकार्य वाढवणे हा आहे. साप्ताहिक ‘देवांग संदेश’ने गेल्या २५ वर्षांत समाजहितासाठी केलेल्या कार्याचा हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
या मेळाव्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यांतून मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित राहणार असून, अनेक प्रतिष्ठित सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती हटगार नेकारचे संपादक ओमशंकर हुलगेरी यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी खालील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे
श्री. विजयकुमार जुंजा, श्री. अंबादास खराडे, श्री. सुनील जेऊरे (वकील), श्री. सिध्दलिंग म्हेत्रे, श्री. ओमशंकर हुलगेरी,
श्री. सोमशंकर अष्टगी, श्री. शिवानंद कलबुर्गी तसेच सौ. भारती विजयकुमार जुंजा, सौ. महानंदा सोमशंकर अष्टगी,
सौ. राजश्री शिवशंकर धोडमणी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नोंदणी पूर्णतः मोफत आहे
सर्व वधू–वरांनी कार्यक्रमस्थळी प्रत्यक्ष उपस्थित राहणे बंधनकारक राहील.
📞 संपर्कासाठी
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क —
श्री. शंकर धोडमणी : ९९७०३६३५५५
श्री. शिवराज नागठाण : ९८३४४५१०१९
मोबाईल : ९४२१०२०६१२




