Prabuddha Raj

Latest Marathi News

नवा पूल बांधण्यासाठी मरीआई चौक ते अण्णाभाऊ साठे चौक (भैय्या चौक) वर्षभरासाठी बंद ; ९ डिसेंबर पासून वाहतुक बदलणार

सोलापूर (प्रतिनिधी) :- शहरातील महत्त्वाच्या मरीआई चौक रेल्वे पुलाची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याने तो पाडून नवीन पूल उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या कामासाठी संपूर्ण मार्ग ९ डिसेंबर २०२५ ते ८ डिसेंबर २०२६ या कालावधीत वर्षभर पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबतचा अधिकृत आदेश पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी जारी केला आहे.

मरीआई चौक रेल्वे पूल हा सोलापूर शहरातील प्रमुख जोडणारा मार्ग असल्याने या बंदच्या काळात शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात बदलणार आहे. या कालावधीत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक ते मरीआई चौक हा संपूर्ण मार्ग बंद राहील.

* जड वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग

मंगळवेढा रोडवरून हैद्राबाद, तुळजापूर, विजापूर किंवा पुण्याकडे जाणारी वाहतूक खालीलप्रमाणे वळविण्यात आली आहेः👇

* नवीन विजापूर रोड → केगाव बायपास

* देगाव – दमाणी नगर रहिवाशांसाठी मार्ग

शहरात येण्या-जाण्यासाठी खालील पर्यायी मार्ग वापरण्यात येणार आहे…👇

* जगताप हॉस्पिटल → C.N.S. हॉस्पिटल → जानकर नगर → नवीन रेल्वे बोगदा → अभिमानश्री नगर → अरविंदधाम वसाहत → जुना पुना नाका

मरीआई चौक – ST स्टॅण्ड वाहतूक

* शेटेनगर रेल्वे बोगदा → खमीतकर अपार्टमेंट → MSEB ऑफिस → निराळे वस्ती → ST स्टॅण्ड
(येणे आणि जाणे या दोन्हीसाठी हा मार्ग लागू)

मरीआई चौक – रेल्वे स्टेशन वाहतूक

* नागोबा मंदिर → रामवाडी → पोलिस चौकी → रामवाडी दवाखाना → मोदी बोगदा → जांबमुनी चौक → मोदी चौकी → कुमार चौक ~ रेल्वे स्टेशन

बांधकाम सुरू असताना नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा, अनावश्यक गर्दी, वाहनतळ अडथळा आणि अपघात टाळण्यासाठी पोलिसांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.