Prabuddha Raj

Latest Marathi News

“विधानपरिषदेचे सभापती व उपसभापतींची ‘सुयोग’ पत्रकार निवासस्थानी भेट- पत्रकारांच्या सुविधांची पाहणी”

नागपूर (प्रतिनिधी) :- विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नागपूर येथील सुयोग पत्रकार निवास येथे भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांसाठी करण्यात आलेल्या निवास, व्यवस्था आणि सुविधा यांचा त्यांनी प्रत्यक्ष पाहणीद्वारे आढावा घेतला.

या भेटीदरम्यान मंत्रालय विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी सभापती आणि उपसभापतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पत्रकारांचे निवास, भोजन, प्रसार माध्यम सुविधा तसेच इतर आवश्यक सेवांबाबतांना माहिती देण्यात आली.

सभापती आणि उपसभापतींनी पत्रकारांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, मागण्या आणि अडचणी जाणून घेतल्या. राज्यातील लोकशाही व्यवस्था सक्षम ठेवण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी जितेंद्र भोळे (विधिमंडळ सचिव), डॉ.विलास आठवले, निलेश मदाने (जनसंपर्क अधिकारी), किशोर गांगुर्डे,संचालक (माहिती) प्रशासन, (माहिती व जनसंपर्क विभाग), गोविंद अहंकारी,संचालक (माहिती) वृत्त व जनसंपर्क, डॉ.गणेश मुळे (संचालक),नागपूर-अमरावती विभाग यांची उपस्थिती होती.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुयोग पत्रकार निवासातील व्यवस्था आणि सुविधांची ही अधिकृत पाहणी महत्वाची ठरली असून, पत्रकारांच्या सोयीसाठी आवश्यक सुधारणा लवकर करण्यात येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.