क्राईम

हैदराबाद रोड मुळेगाव फाटा येथे भीषण अपघात; वृद्धाचा जागीच मृत्यू, नातू थोडक्यात बचावला

सोलापूर (प्रतिनिधी) :- मुळेगाव फाटा, हैद्राबाद रोड सग्गम नगर परिसरात आज सकाळी भीषण अपघात झाला असून या अपघातात ७९ वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच दुचाकीवर मागे बसलेला १५ वर्षीय मुलगा थोडक्यात बचावला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मृत व्यक्तीचे नाव दुब्बराजम नरसय्या गोसकी (वय ७९, रा. कुमार स्वामी नगर, शेळगी) असे असून त्यांचा नातू दिनेेश श्रीनिवास गोसकी (वय १५) किरकोळ जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेजण जुना विडी घरकुल परिसरातून आपल्या दुचाकीवरून (एमएच १३ एच ८२२१) शेळगीकडे जात होते. मुळेगाव क्रॉस रोडवर रस्ता पार करत असताना हैद्राबादवरून सोलापूरकडे भरधाव वेगात येणाऱ्या हटकेश्वर सिमेंट कंपनीच्या एमएच १२ एमव्ही १२७७ या मालवाहतूक वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी जबरदस्त होती की दुब्बराजम गोसकी यांचा जागीच मृत्यू झाला.

Oplus_16908288

घटनास्थळी क्षणात नागरिकांची गर्दी जमा झाली. तेव्हा उपस्थित पत्रकार अजमेर शेख यांनी तात्काळ कंट्रोल १०० आणि रुग्णवाहिका सेवेवर संपर्क साधत अपघाताची माहिती दिली.

Oplus_16908288

काही मिनिटांतच ऍम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाली आणि पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह सिव्हिल हॉस्पिटल येथे शवविच्छेदनासाठी हलवला. जखमी मुलाला प्राथमिक उपचार देण्यात आले.

घटनेनंतर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध पुढील तपास सुरू केला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!