सोलापूर

टीईटी परीक्षेमुळे सोलापूरात वाहतूक खोळंबा; जिल्हा परिषदेसमोर वाहनांची प्रचंड कोंडी

सोलापूर (प्रतिनिधी) -: राज्यातील टीईटी परीक्षा आज पार पडली आणि या परीक्षेमुळे सोलापूर शहरात वाहतूक व्यवस्थेचे मोठे चित्र बदलले. विविध जिल्ह्यांतून आलेल्या विद्यार्थ्यांनी आणि परीक्षा पथकाने चारचाकी वाहनांचा मोठा ताफा आणल्यामुळे जिल्हा परिषद कार्यालयासमोर संध्याकाळी पाच वाजल्यानंतर प्रचंड कोंडी निर्माण झाली.

पेपर सुटताच मोठ्या प्रमाणात परीक्षार्थी बाहेर पडले आणि वाहनांची गर्दी वाढल्याने काही काळ रस्ता पूर्णपणे ठप्प झाला. अनेक वाहनचालकांना लांब रांगेत अडकून हालचाल करणे कठीण झाले.

विशेष म्हणजे, टीईटी परीक्षेसाठी भरारी पथकावर असलेले जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता देखील त्याच वाहतूक कोंडीत अडकले. काही वेळ वाहनांना इंच-इंच पुढे सरकावे लागत होते.

वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपेक्षित असलेले वाहतूक पोलीस घटनास्थळी अद्याप पोहोचले नव्हते, ही बाब नागरिकांमध्ये नाराजीचा विषय ठरली. अशा परिस्थितीत जिल्हा परिषदेचे शिपाईच वाहनांना दिशा देत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत होते; मात्र वाहनांची संख्या जास्त असल्याने कोंडी पूर्णपणे कमी झाली नाही.

टीईटीमुळे वाढलेल्या वाहनांच्या तांदळ्यामुळे निर्माण झालेली कोंडी आणि प्रशासनातील समन्वयाचा अभाव हा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे. नागरिकांनी अशा परीक्षांच्या नियोजनात वाहतूक व्यवस्थेला अग्रक्रम द्यावा, अशी मागणी केली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!