क्राईमसोलापूर

इब्राहीमपूर येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग : सुमारे २० एकर ऊस जळून खाक

अग्निशमन दलाच्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला, नाहीतर ५० एकर ऊस जळाला असता

इब्राहीमपूर येथे शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग : सुमारे २० एकर ऊस जळून खाक

अग्निशमन दलाच्या तातडीच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला, नाहीतर ५० एकर ऊस जळाला असता

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील इब्राहिमपूर येथे दुपारी १२ वाजता शॉर्ट सर्किटमुळे उसाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २० एकर ऊस जळून खाक झाला असून चार शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

आगीत नुकसान झालेले शेतकरी व गट नंबर खालीलप्रमाणे –

1) श्रीकांत अमृत कौलगी – गट नं. 38
2) शांतप्पा गुंडप्पा दिंडूरे – गट नं. 33
3) लक्ष्मीकांत अप्पाशा कौलगी – गट नं. 38/2
4) शरणबसप्पा यशवंत कौलगी – गट नं. 37

शेतकऱ्यांनी वर्षभर काबाडकष्ट करून, कर्ज काढून, पाणी देऊन ऊस जगवला होता. तोडणीला आलेला ऊस डोळ्यादेखत जळून गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

 

आग लागल्याची माहिती मिळताच रिपाई अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे यांनी तात्काळ उपसभापती सागर दादा कल्याणशेट्टी यांना संपर्क साधला. त्यांच्या तातडीच्या प्रयत्नामुळे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यात यश मिळवले.

अग्निशमन दल वेळेत पोहोचले नसते तर सुमारे ५० एकर ऊस जळाला असता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

संबंधित विभागाने तातडीने या शेतांचे पंचनामे करून, या चारही शेतकऱ्यांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

 

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!