सोलापूर

शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शहाजी पवार यांचा पुढाकार ; वाढीव पाणी सोडण्याची अधिकाऱ्यांकडून खातरजमा

बी. बी. दारफळ परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी; शिरापूर उपसा सिंचनाच्या कालव्यांतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची निदर्शनास

शेतकऱ्यांच्या पाण्यासाठी शहाजी पवार यांचा पुढाकार ; वाढीव पाणी सोडण्याची अधिकाऱ्यांकडून खातरजमा

बी. बी. दारफळ परिसरातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी; शिरापूर उपसा सिंचनाच्या कालव्यांतून अपुरा पाणीपुरवठा होत असल्याची निदर्शनास

उत्तर सोलापूर : अत्यल्प पावसामुळे बी. बी. दारफळ तसेच परिसरातील शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीची भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य मा. शहाजी भाऊ पवार यांनी प्रत्यक्ष गावशिवारात जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत त्यांनी पाणीप्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

परिसरातील शेतीसाठी शिरापूर उपसा सिंचन प्रकल्पाच्या डावा कालवा व उजवा कालवा येथून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रत्यक्ष आढावा शहाजी पवार यांनी घेतला. उपलब्ध पाणी शेतकऱ्यांच्या गरजेच्या तुलनेत अपुरे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत अधिकाऱ्यांकडे तातडीने पाठपुरावा केला.

पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पाणीपुरवठा अपुरा राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहाजी पवार यांनी संबंधित यंत्रणेशी तातडीने संपर्क साधून कालव्यांमधून वाढीव पाणी सोडण्याबाबत पाठपुरावा केला. तसेच वाढीव पाणी सोडले जात असल्याची खातरजमा करून घेत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

अत्यल्प पावसामुळे परिसरातील शेतीवर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहाजी पवार यांनी स्वतः गावशिवारात फिरून परिस्थितीची पाहणी करत शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधले, यामुळे शेतकरी बांधवांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

यावेळी वैभव पाटील, नागेश नन्नावरे, अमोल पाटील, विलास दादा साठे, दशरथ पवार, ऋषिकेश बारसकर, दिनेश पाटील, अमोल साठे, अण्णा कदम यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!