श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न

श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा संपन्न
सोलापूर : इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर संचलित श्रीमती निर्मलाताई ठोकळ प्रशालेत पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यशाळेत विद्यार्थ्यांना निसर्गात उपलब्ध पर्यावरणपूरक शाडूमाती तसेच बॉम्बे मातीचा उपयोग करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती गणपती म्हणजेच इको फ्रेंडली गणपतीची निर्मिती कशी करावी याचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले. वाढते जलप्रदूषणाची समस्या लक्षात घेता पर्यावरण पूर्वक गणेश निर्मिती किती आवश्यक आहे हे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
प्रशालेतील विद्यार्थ्यांनी गणेश मूर्ती निर्मिती प्रात्यक्षिकाचे काळजीपूर्वक निरीक्षण करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या पर्यावरण पूरक मातीचा वापर करून फारच कमी वेळेत गणेशाची मूर्ती बनवली व इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मितीचा आनंद लुटला यावेळेस आपल्या घरी पर्यावरणपूर्वक गणेशाची प्रतिष्ठापना करण्याची शपथ घेतली.कार्क्रमात माजी शिक्षण विस्तार अधिकारी श्री. अशोक भांजे यांनी शाळेच्या विविध उपक्रमाबद्दल कौतुक करत. इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळेच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त केला.
संस्थेचे अध्यक्ष श्री विपिन ठोकळ, उपाध्यक्ष श्री सचिन ठोकळ, सचिव श्री भिकाजी गाजरे, संचालिका शिल्पाताई ठोकळ यांनी सदर पर्यावरणपूरक गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा आयोजनाबद्दल व पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक पाऊल टाकल्याबद्दल शाळेचे, व सर्वांचे कौतुक व अभिनंदन केले. या कार्यशाळेचा लाभ शाळेतील 400 विद्यार्थ्यांनी घेतला.
कार्यशाळेसाठी प्राचार्य श्री डी. डी. गाजरे यांचे कुशल नियोजन व मार्गदर्शन लाभले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूनम चव्हाण यांनी केले. तर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी सहशिक्षक श्री रमणशेट्टी एन.,सी.श्री आनंद ढगे, सौ. कारंडे एम एन, यांसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



