स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात १२१ वृक्षांचे वृक्षारोपण
बँक ऑफ इंडियाचा १२१ वा वर्धापन दिन उत्साहात

स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात १२१ वृक्षांचे वृक्षारोपण
बँक ऑफ इंडियाचा १२१ वा वर्धापन दिन उत्साहात
सोलापूर, दिनांक 8: बँक ऑफ इंडियाच्या १२१ व्या वर्धापन दिनानिमित्त सोलापूर विभागीय कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात १२१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमांमध्ये बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी वॉकथॉन, रक्तदान शिबिर तसेच बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी कर्मचारी आणि ग्राहकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच स्टार ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात १२१ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी लक्ष्मण आवारे, जिल्हा परिषद ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप आणि जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमास विभागीय अधिकारी मानस झा, उपविभागीय अधिकारी एन. व्ही. राव, उपविभागीय अधिकारी (रिकव्हरी) प्रेमचंद, नाबार्डचे व्यवस्थापक नितीन शेळके, अमोल सांगळे, विश्वास वेताळ, दीपक वडेवाले, उमेदचे जिल्हा व्यवस्थापक सचिन चवरे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहक उपस्थित होते.
यावेळी विभागीय अधिकारी मानस झा यांनी बँक ऑफ इंडियाच्या विविध ग्राहकाभिमुख योजना आणि सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. सामाजिक बांधिलकी, ग्राहकसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत बँक ऑफ इंडियाचा १२१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.



