क्राईम

पुण्यात महसूल खात्यात मोठी कारवाई; प्रांताधिकारी दोन लाखांच्या लाचेसह जाळ्यात

पुण्यात महसूल खात्यात मोठी कारवाई; प्रांताधिकारी दोन लाखांच्या लाचेसह जाळ्यात

पुणे (प्रतिनिधी):- पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आणणारी धडक कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) केली आहे. आंबेगाव-जुन्नर तालुक्याचे उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) गोविंद शिंदे आणि त्यांच्या कार्यालयातील लिपिक राहुल खैरनार यांना तब्बल दोन लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मंचर येथील प्रांताधिकारी कार्यालयात शुक्रवारी (२७ मार्च) पार पडली.

नारायणगाव परिसरातील एका बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) या प्रकरणी ACB कडे अधिकृत तक्रार दाखल केली होती. संबंधित व्यावसायिकाने आपले बांधकाम पूर्ण केल्यानंतर, नियमानुसार आवश्यक असलेला बांधकाम पूर्णत्व दाखला मिळवण्यासाठी प्रांत कार्यालयात अर्ज केला होता.

मात्र, हा दाखला देण्यासाठी आणि काम लवकर पूर्ण करून देण्यासाठी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी पदाचा गैरवापर करत दोन लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला.

तक्रार मिळाल्यानंतर ACB अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पडताळणी केली. लाचेची मागणी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी सापळा रचला.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून रक्कम स्वीकारत असताना प्रांताधिकारी आणि लिपिक या दोघांनाही रंगेहात पकडण्यात आले, आणि तात्काळ ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. ACB कडून या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

या धडक कारवाईमुळे पुणे जिल्ह्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा सुरू असून,

“सामान्य नागरिकांकडून कामासाठी लाच मागितली जाते का?”

“प्रशासनात अजून किती भ्रष्टाचार दडलेला आहे?”

असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!