सावळेश्वर दर्ग्याजवळ काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
वडील जखमी; सोलापूरकडे जात असताना पुलावर भीषण अपघात

सावळेश्वर दर्ग्याजवळ काळाचा घाला; कंटेनरच्या धडकेत २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
वडील जखमी; सोलापूरकडे जात असताना पुलावर भीषण अपघात
सावळेश्वर : सोलापूरच्या दिशेने मोटारसायकलवरून जात असलेल्या बाप-लेकाच्या दुचाकीला सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर कंटेनरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात प्रशांत टेकाळे (वय अंदाजे २१ ते २२ वर्षे, रा. सावळेश्वर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचे वडील जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, प्रशांत टेकाळे हे आपल्या वडिलांसोबत MH.13.BM.4199 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून सोलापूरच्या दिशेने जात होते. सावळेश्वर दर्ग्याजवळील पुलावर त्यांच्या दुचाकीला TS.08.UB.4244 क्रमांकाच्या कंटेनरने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील प्रशांत टेकाळे यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात त्यांचे वडीलही जखमी झाले. अपघातानंतर परिसरात काही काळ एकच गोंधळ उडाला होता.
जखमी वडिलांना तातडीने मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्घटनेबाबत पुढील तपास सुरू असून, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता होणार आहे.
सावळेश्वर परिसरात या अपघातामुळे हळहळ व्यक्त होत असून, तरुणाच्या अकाली मृत्यूने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



