सेवा सप्ताहानिमित्त कारंब्यात भाजप ओबीसी मोर्चाचा सामाजिक उपक्रम
अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार; आरोग्य शिबिरात २१० नागरिकांची तपासणी

सेवा सप्ताहानिमित्त कारंब्यात भाजप ओबीसी मोर्चाचा सामाजिक उपक्रम
अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार; आरोग्य शिबिरात २१० नागरिकांची तपासणी
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या निमित्ताने भाजप ओबीसी मोर्चा (सोलापूर पूर्व) यांच्या वतीने कारंबा येथे विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अंगणवाडी सेविका व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार तसेच नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.

या आरोग्य शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तब्बल २१० नागरिकांची रक्तदाब (बीपी) आणि रक्तातील साखरेची (शुगर) तपासणी करण्यात आली. नागरिकांच्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून आवश्यक त्या आरोग्यविषयक सूचना देण्यात आल्या.

समाजासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. सेवा, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
या कार्यक्रमास संभाजी दडे, विनायक सुतार, भगवान सुतार, अंबादास गायकवाड, नागनाथ पाटील, शहाजी गायकवाड, अकबर पटेल, सत्तारभाई शेख, राहुल मस्के, अमोल सुतार, संजय आदाटे, मशाक शेख यांच्यासह अंगणवाडी सेविका, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने श्रीमती सलगर, राणी, सुतार, कांबळे, शेटे, शेख पूजा, नागटिळक आणि उबाळे यांनी आरोग्य सेवा बजावली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आदाटे यांनी केले. विनायक सुतार यांनी प्रास्ताविक केले, तर अमोल सुतार यांनी आभार मानले.



