सोलापूर

‘कागदोपत्री पूर्तता नको, गावात प्रत्यक्ष विकास दिसला पाहिजे’; कुशल जैन यांचे स्पष्ट निर्देश

संविधान दिनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन; ग्रामविकासासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन

‘कागदोपत्री पूर्तता नको, गावात प्रत्यक्ष विकास दिसला पाहिजे’; कुशल जैन यांचे स्पष्ट निर्देश

संविधान दिनी उद्देशिकेचे सामूहिक वाचन; ग्रामविकासासाठी प्रशासनाने समन्वयाने काम करण्याचे आवाहन

पंढरपूर : ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० प्रभावीपणे राबविणे आवश्यक असून, या अभियानाच्या यशस्वितेसाठी सर्व अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामपंचायत स्तरावरील यंत्रणेने समन्वयाने व जबाबदारीने प्रयत्न करावेत. अभियानातील निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करून प्रत्येक गावाच्या विकासाला नवी दिशा द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.

पंचायत समिती पंढरपूर येथे आयोजित अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. *यावेळी प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ, पंचायत समितीचे सभापती शुभम आगवणे, उपसभापती प्रमोद देशमुख, जिल्हा परिषद सदस्य आदिनाथ देशमुख, संतोष बागल, शहाजी मुळे, श्रीमती आकाताई लोखंडे, श्रीमती भोसले, श्री. झांबरे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा चंद्रशेखर जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) सूर्यकांत भुजबळ आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती पंढरपूर अमोल जाधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २.० अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि विकासकामांचा यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रत्येक ग्रामपंचायतीने अभियानातील निकष समजून घेऊन त्यानुसार कामांचे सूक्ष्म नियोजन करावे. केवळ कागदोपत्री पूर्तता न करता गावपातळीवर प्रत्यक्ष कामातून विकास दिसला पाहिजे. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.

घरकुल योजनांचा आढावा घेताना ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलांचे बांधकाम अद्याप सुरू झालेले नाही, अशा प्रकरणांमध्ये ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून तातडीने बांधकाम सुरू करून घ्यावे. पात्र लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी नियमित पाठपुरावा करावा. घरकुलांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रियपणे काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, आज २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनानिमित्त पंचायत समिती पंढरपूर येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही मूल्ये, न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वांचे महत्त्व यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या आढावा बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, विस्तार अधिकारी तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
आढाव बैठक यशस्वी करण्यासाठी कक्ष अधिकारी शाहाजान तांबोळी वरिष्ठ सहाय्यक महेश वैद्य यांनी परिश्रम घेतले

ग्रामीण विकासाला गती देणे, शासनाच्या योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे आणि लोकसहभागातून सक्षम व आदर्श ग्रामपंचायती निर्माण करणे, हेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे उद्दिष्ट असून, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने प्रयत्न करावेत, असा संदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी यावेळी दिले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!