संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन; जिल्हा परिषदेत लोकशाही मूल्यांचा जागर!
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने २६ नोव्हेंबरचा सोहळा उत्साहात; विविध पदाधिकारी, कर्मचारी व मान्यवरांचा सहभाग

संविधानाच्या उद्देशिकेला अभिवादन; जिल्हा परिषदेत लोकशाही मूल्यांचा जागर!
महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने २६ नोव्हेंबरचा सोहळा उत्साहात; विविध पदाधिकारी, कर्मचारी व मान्यवरांचा सहभाग
सोलापूर : भारतीय संविधानाने देशाला दिलेली लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय ही मूल्ये समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने गुरुवारी (दि. २६ नोव्हेंबर) सोलापूर जिल्हा परिषद येथे संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा शाखा सोलापूर यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला पुष्प अर्पण करून महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

संविधान दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद परिसरात संविधानातील लोकशाही मूल्यांचे स्मरण करण्यात आले. भारतीय संविधान हे केवळ देशाच्या प्रशासनाचा आधार नसून प्रत्येक नागरिकाला समान हक्क, न्याय आणि प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार देणारा मूलभूत दस्तऐवज आहे. संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबतच नागरिकांनी आपली कर्तव्येही जबाबदारीने पार पाडावीत, हा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे जिल्हाध्यक्ष दयानंद परिचारक, कार्याध्यक्ष विशाल घोगरे, सचिव त्रिमूर्ती राऊत तसेच महाराष्ट्र राज्य विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने यांनी विशेष परिश्रम घेतले.
यावेळी युनियनचे माजी जिल्हाध्यक्ष तजमूल मुतवल्ली, श्रीशैल देशमुख, शरद वाघमारे, नितीन जाधव, हनमे सर, डिजिटल मीडिया पत्रकार योगीराज हब्बू, तसेच श्रीधर कलशेट्टी, शिवाजी राठोड, मोहिते, देवकर, अभिजित निचळ, दत्ता गुरव, जाफर शेख, राजू ताकभाते, संजय पाटील, तम्मेवार, ताकभाते, हाजीलाल मकानदार, पेद्दे, निट्टुरे, अर्जुन हाटकर आणि बस्सू डमडमे यांच्यासह जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संविधान दिनाच्या या कार्यक्रमातून भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त करण्याबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आणि सामाजिक न्यायाच्या संकल्पनेचा जागर करण्यात आला. संविधानातील मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याचा संदेश देत कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.



