सोलापूर

मानवता विकास विद्यामंदिर, मद्रे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!

ॲड. अनिल वासम यांचे विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांवर मार्गदर्शन

मानवता विकास विद्यामंदिर, मद्रे येथे संविधान दिन उत्साहात साजरा!

ॲड. अनिल वासम यांचे विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्यांवर मार्गदर्शन

मद्रे : मानवता विकास विद्यामंदिर, मद्रे येथे २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिन उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय येथील ॲड. अनिल वासम यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाची निर्मिती, त्याचे महत्त्व, लोकशाही मूल्ये, मूलभूत अधिकार व नागरिकांची कर्तव्ये याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हतूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. भारत अंगुले होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मूल्यवर्धन तालुका समन्वयक श्री. किशोर झेंडेकर, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. राहुल शेख यांच्यासह संस्थेचे संचालक श्री. मुकुंद माने, श्री. करजगीकर, श्री. मोकाशी, श्री. तोळणुरे व श्री. वाघमारे उपस्थित होते.

 

मार्गदर्शन करताना ॲड. अनिल वासम म्हणाले की, भारतीय संविधान हा केवळ कायद्यांचा दस्तऐवज नसून प्रत्येक भारतीयाच्या सन्मानपूर्ण जीवनाचा आधार आहे. संविधानाने प्रत्येक नागरिकाला न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांची हमी दिली आहे. विद्यार्थ्यांनी संविधानाचा अभ्यास करून जात, धर्म आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि बंधुभाव जोपासणारे जागरूक व जबाबदार नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतात भारत अंगुले यांनी संविधान हे भारतीय लोकशाहीचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे सांगून अधिकारांसोबत कर्तव्यांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. किशोर झेंडेकर यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात संविधानिक मूल्यांची रुजवण होण्याची आवश्यकता व्यक्त केली, तर मुख्याध्यापक राहुल शेख यांनी संविधानातील आदर्श दैनंदिन जीवनात आचरणात आणण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जागरूकता निर्माण करण्यासह लोकशाही, सामाजिक समता, न्याय आणि बंधुतेचा संदेश देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!