हयातीचा दाखला डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बाबत २६ नोव्हेंबर रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
हयातीचा दाखला डिजिटल लाईफ सर्टिफिकेट बाबत २६ नोव्हेंबर रोजी विशेष मेळाव्याचे आयोजन
निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना जिल्हा कोषागार कार्यालयाचे आवाहन
सोलापूर, दि. २४ (जि. मा. का.) : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी हयातीचा दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट – DLC) सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर तसेच तालुकास्तरावरील निवृत्तीवेतनधारकांनी संबंधित कोषागार कार्यालयात हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी, डॉ. वैभव राऊत यांच्या वतीने करण्यात आले आहे.
डिजिटल लाईफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, येथे तसेच जिल्ह्यातील उपकोषागार कार्यालय येथे निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी विशेष मेळाव्याचे आयोजन गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्यात हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार आहे.
ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांनी स्वतःचा मोबाईल, आधारकार्ड, निवृत्तीवेतन आदेश (PPO) व बँक पासबुकची प्रत सोबत आणावी.
हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी पुढील सुविधा उपलब्ध आहेत :
१. जीवन प्रमाण पोर्टल : https://jeevanpramaan.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल.
२. मोबाईल ॲपद्वारे : अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘जीवन प्रमाण’ (Jeevan Pramaan) ॲप डाउनलोड करून ऑनलाइन पद्धतीने हयातीचा दाखला सादर करता येईल.
अधिक माहितीसाठी निवृत्तीवेतनधारकांनी ई-मेल solapur.pension@gmail.com किंवा दूरध्वनी क्रमांक ०२१७-२७३१०३६ यावर संपर्क साधावा.
— जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर
0000



