महाराष्ट्र

प्रतिकूल परिस्थितीवर मात केलेल्या महिलांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गौरव

प्रतिकूल परिस्थितीवर मात केलेल्या महिलांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत गौरव

मुंबई (प्रतिनिधी):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील विविध क्षेत्रांत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यासाठी “सक्षम महिला – सशक्त महाराष्ट्र” हा विशेष सन्मान सोहळा ९ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम दुपारी १ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरीमन पॉईंट, मुंबई येथे होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

या सन्मान सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांचीही उपस्थिती असणार आहे.

या कार्यक्रमात समाजातील विविध घटकांमधील महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. अनाथ प्रमाणपत्र प्राप्त महिला, बालगृहात राहिलेल्या महिला, शक्ती सदन, निरीक्षण गृह, महिला आश्रम व महिला वसतिगृहातील महिला तसेच अंगणवाडी सेविका अशा विविध क्षेत्रांतील महिलांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यशाचे शिखर गाठले आहे. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याचा सन्मान या सोहळ्यात केला जाणार आहे.

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, समाजातील कठीण परिस्थितीवर मात करून पुढे आलेल्या महिलांनी इतरांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून समाजातील इतर महिलांनाही प्रेरणा मिळावी आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी हा या कार्यक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सन्मान सोहळा महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!