सोलापूर

बकरी ईदपूर्वी सोलापुरात पोलिसांची धडक मोहीम; गोवंश तस्करीतील ५० आरोपींना डीसीपी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

‘सिंघम’ स्टाईल अॅक्शन! डीसीपी प्रीतम यावलकरांचा गुन्हेगारांना थेट इशारा

बकरी ईदपूर्वी सोलापुरात पोलिसांची धडक मोहीम; गोवंश तस्करीतील ५० आरोपींना डीसीपी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश

‘सिंघम’ स्टाईल अॅक्शन! डीसीपी प्रीतम यावलकरांचा गुन्हेगारांना थेट इशारा

सोलापूर :- आगामी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. शहरातील गोवंश तस्करी, अवैध वाहतूक, वाहन अडविणे, मारहाण तसेच समाजात तणाव निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या तब्बल ५० रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस उपायुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

डॅशिंग पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी स्वतः या आरोपींची चौकशी करत त्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला. सणासुदीच्या काळात कोणत्याही प्रकारे शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली.

शनिवारी पार पडलेल्या या विशेष कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रत्येक आरोपीची माहिती, त्यांच्या हालचाली आणि मागील गुन्हेगारी पार्श्वभूमीची सविस्तर पडताळणी केली. त्यामुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांच्या या अॅक्शन मोडची शहरभर चर्चा सुरू आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून येत्या सोमवारी (दि. २५) आणखी काही रेकॉर्डवरील आरोपींना पोलीस कार्यालयात बोलावण्यात येणार आहे. गोवंश तस्करीसह संवेदनशील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर पोलिसांचे विशेष लक्ष असल्याचेही समोर आले आहे.

पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी सातत्याने धडक मोहिमा राबवल्या आहेत. अवैध धंदे, सराईत गुन्हेगार आणि समाजकंटकांवर कारवाई करून शहरातील कायदा व सुव्यवस्था मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांकडूनही या कारवाईचे स्वागत होत आहे.

याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर म्हणाले की,
“ज्यांच्यावर गोतस्करी किंवा संबंधित प्रकारचे गुन्हे दाखल झाले आहेत आणि जे वारंवार अशा घटनांमध्ये सहभागी होत आहेत, त्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. आगामी काळात शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.”

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!