भविष्यातील तारखांना हजेरी? सामाजिक वनीकरण विभागात बनावट उपस्थितीचा धक्कादायक प्रकार — भ्रष्टाचाराचा नवा अध्याय!”
“भविष्यातील तारखांना हजेरी? सामाजिक वनीकरण विभागात बनावट उपस्थितीचा धक्कादायक प्रकार — भ्रष्टाचाराचा नवा अध्याय!”
धाराशिव (प्रतिनिधी):-
सामाजिक वनीकरण विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि दस्तऐवजीकरणातील फेरफार समोर आले असून, विभागाच्या हजेरी नोंदवहीत भविष्यातील तारखांना कर्मचाऱ्यांच्या सह्या आढळल्याने प्रशासनात आणि नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सरकारी कार्यालयातील शिस्त, प्रशासनातील पारदर्शकता आणि जबाबदारी यावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही बाब संवेदनशील मानली जात आहे.
तपासादरम्यान असे स्पष्ट झाले की, काही कर्मचाऱ्यांनी अद्याप न आलेल्या वा भविष्यातील तारखांच्या समोर स्वतःच्या सह्या आधीच केल्या आहेत.
याचा अर्थ असा की-
कर्मचारी प्रत्यक्ष उपस्थित नसताना उपस्थिती दाखवली गेली
सरकारी वेळेचा दुरूपयोग झाला
बनावट हजेरीच्या आधारे वेतन, भत्ते व लाभ घेण्याची शक्यता
यामुळे प्रशासनातील विश्वासार्हता आणि शिस्त मोडीत निघाल्याचा आरोप होत आहे.
या प्रकरणाची दखल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घेतली असून, चौकशी आदेशित करण्यात आली आहे.
दोषी आढळणाऱ्यांवर शिस्तभंग कार्यवाही, वेतन रोखणे, तसेच नियमभंग व बनावट नोंदणीसाठी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची शक्यता सूचित करण्यात आली आहे.
एक वरिष्ठ अधिकारी म्हणाले
“सरकारी दस्तऐवजांमध्ये अशाप्रकारे फेरफार करणे हा गंभीर गुन्हा आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल.”



