महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात; जिल्हा परिषदेत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राज्य शोकसागरात; जिल्हा परिषदेत राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर

सोलापूर (प्रतिनिधी):- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुःखद निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री यांनी आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करत तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. या आदेशानुसार सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीसमोरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर (मधोमध) उतरवण्यात आला.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या कार्यालय परिसरात आज शोकमय वातावरण पाहायला मिळाले.

मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार आज राज्यातील सर्व शासकीय कार्यालये बंद ठेवण्यात आली असून पुढील तीन दिवस शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. या काळात सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!