महत्वाचे कागदपत्रे जप्त; लाच प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ
महत्वाचे कागदपत्रे जप्त; लाच प्रकरणामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ
मुंबई (प्रतिनिधी):- मंत्रालयातील गाजत असलेल्या लाच प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB)ने मोठी कारवाई करत मुख्य संशयित आरोपी राजेंद्र ढेरिंगे यांच्या नाशिक रोड येथील निवासस्थानी छापा टाकला. या कारवाईदरम्यान एसीबी पथकाने घराची सखोल झडती घेतली असून तपासासाठी महत्त्वाची कागदपत्रे आणि काही पुरावे हस्तगत केल्याची माहिती समोर आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रांमुळे लाच व्यवहाराचे धागेदोरे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पुराव्यांच्या आधारे एसीबीकडून पुढील तपास अधिक वेगाने सुरू करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अडचणीत वाढ झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विरोधकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
एसीबीकडून संबंधित आर्थिक व्यवहार, कागदपत्रांची पडताळणी आणि इतर संशयित व्यक्तींची चौकशी सुरू असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.





