महाराष्ट्र

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारची मोठी पाऊले; मंत्रिमंडळ बैठकीनंतर विशेष कार्यक्रम

पर्यावरण संवर्धनासाठी राज्य सरकारची मोठी पाऊले; मंत्रिमंडळ बैठकीनंतर विशेष कार्यक्रम

मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या #माझीवसुंधरा योजनेच्या बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार प्रमुख उपस्थित होते. तसेच पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.

मंत्रालयात पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर आयोजित या विशेष कार्यक्रमास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह विविध विभागांचे मंत्री, वरिष्ठ अधिकारी व सचिव उपस्थित होते.

राज्यात पर्यावरण संरक्षण, वृक्षारोपण, जलसंवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि हवामान बदलावर उपाययोजना यासाठी माझी वसुंधरा मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे, स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन देणे आणि शाश्वत विकास साध्य करणे हे उद्दिष्ट आहे.

कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, पर्यावरण संरक्षण ही केवळ सरकारी जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. ‘माझी वसुंधरा’ मोहिमेमुळे राज्यातील पर्यावरण संवर्धनाला नवी दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले की, राज्यभरात हरित उपक्रम, प्लास्टिक कमी करण्यासाठी उपाय, जलसंधारण व जैवविविधता जपण्यासाठी विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. नव्या बोधचिन्हामुळे मोहिमेला वेगळी ओळख मिळून जनसहभाग वाढेल, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी पर्यावरण रक्षणाचा संकल्प व्यक्त करत राज्यात हरित व स्वच्छ वातावरण निर्माण करण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!