“जबर धक्का! चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेश पाटील पराभूत, जाधव यांचा विजय”
“जबर धक्का! चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेश पाटील पराभूत, जाधव यांचा विजय”
सोलापूर (प्रतिनिधी) :- कुरुल जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर घडला असून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार उमेश पाटील यांना जबर धक्का बसला आहे. अंतिम मतमोजणीत भाजपचे उमेदवार सचिन जाधव यांनी तब्बल 1303 मतांच्या फरकाने विजय संपादन केला.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, कुरुल गटात सुरुवातीपासूनच चुरशीची लढत पाहायला मिळत होती. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार, सभा आणि मतदारांशी संपर्क मोहीम राबविण्यात आली होती. मतमोजणीदरम्यान सुरुवातीच्या फेऱ्यांमध्ये टक्कर असली तरी शेवटच्या टप्प्यात सचिन जाधव यांनी निर्णायक आघाडी घेत विजय निश्चित केला.
या निकालानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून समर्थकांनी जल्लोष साजरा केला. दरम्यान, उमेश पाटील यांच्या पराभवामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये निराशा व्यक्त होत आहे.



