महाराष्ट्र

दृष्टिबाधित महिला टी-२० क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव; खेळाडूंना सर्वतोपरी मदतीची ग्वाही

दृष्टिबाधित महिला टी-२० क्रिकेट संघाच्या ऐतिहासिक विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौरव; खेळाडूंना सर्वतोपरी मदतीची ग्वाही

मुंबई (प्रतिनिधी) :- भारताच्या दृष्टिबाधित महिला टी-२० क्रिकेट संघाने जागतिक पातळीवर ऐतिहासिक कामगिरी करत अजिंक्यपद पटकावले असून या अभिमानास्पद विजयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेत्या संघातील खेळाडूंचा सन्मान केला. या खेळाडूंनी देशाचे नाव जागतिक व्यासपीठावर उज्ज्वल केले असून तिरंग्याचा सन्मान वाढवला आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.

मुख्यमंत्री म्हणाले की, दृष्टिबाधित महिला क्रिकेटपटूंना सर्‍यात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल. त्यांच्या सरावासाठी आवश्यक सुविधा, आर्थिक सहाय्य, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. कोणतीही आर्थिक किंवा कौटुंबिक अडचण खेळातील प्रगतीस अडथळा ठरू नये, यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खेळाडूंना सरावासाठी स्वतंत्र व कायमस्वरूपी मैदान तसेच इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत क्रीडा आयुक्तांमार्फत चर्चा करून योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

मुख्यमंत्री यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास क्रीडा व युवक कल्याण आयुक्त शीतल तेली उगले, संघाची कर्णधार दीपिका टी.सी., उपकर्णधार व महाराष्ट्राची खेळाडू गंगा कदम, Cricket Association for the Blind in India चे चेअरमन के. जी. महंतेश, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील पांढरे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह संघातील इतर खेळाडू उपस्थित होते.

या सन्मान सोहळ्यामुळे दृष्टिबाधित महिला खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून भविष्यातही जागतिक स्तरावर देशासाठी नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!