महाराष्ट्र

इतिहास घडला! सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

इतिहास घडला! सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

मुंबई (प्रतिनिधी):- महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवा इतिहास रचला गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली असून, उद्या त्यांचा अधिकृत शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या नियुक्तीमुळे महाराष्ट्राला स्थापनेनंतर प्रथमच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे, हा क्षण राज्याच्या राजकीय इतिहासात मैलाचा दगड ठरणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत सुनेत्रा पवार यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. दीर्घ चर्चेनंतर पक्ष नेतृत्वाने त्यांच्या नावाला पसंती देत, राज्याच्या नेतृत्वात महिलांना सर्वोच्च स्थान देण्याचा निर्णायक संदेश दिला आहे.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आतापर्यंत अनेक महिला मंत्र्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली असली, तरी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांसारख्या सर्वोच्च सत्तास्थानांपर्यंत महिलांना पोहोचण्याची संधी मिळाली नव्हती. सुनेत्रा पवार यांच्या निवडीमुळे ही पोकळी भरून निघाली असून, महिला सक्षमीकरणाच्या दिशेने राज्याने मोठे पाऊल टाकले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील अलीकडील राजकीय घडामोडी, पक्षातील फूट आणि अजित पवारांच्या निधनानंतर निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी सुनेत्रा पवार यांना पुढे करण्यात आले आहे. शांत स्वभाव, संघटनात्मक अनुभव आणि निर्णयक्षमता यामुळे त्या पक्षासाठी एक विश्वासार्ह व सक्षम चेहरा म्हणून पुढे आल्या आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रीपदाच्या नियुक्तीमुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकारणात महिलांच्या नेतृत्वाबाबत नवा दृष्टिकोन तयार होणार आहे. उद्याचा शपथविधी हा केवळ सत्ताबदलाचा कार्यक्रम न राहता, महाराष्ट्रातील महिला नेतृत्वाच्या नव्या पर्वाची सुरुवात ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!