सोलापूर

अक्कलकोट नगरपरिषद विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व; सहा सभापतीपदे बिनविरोध

अक्कलकोट नगरपरिषद विषय समित्यांवर भाजपचे वर्चस्व; सहा सभापतीपदे बिनविरोध

अक्कलकोट (प्रतिनिधी):- श्रीक्षेत्र अक्कलकोट नगरपरिषदेच्या सहा विषय समित्यांच्या सभापतीपदांची निवड आज नगरपरिषदेच्या सभागृहात शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत असलेल्या भारतीय जनता पक्षाने या सर्व विषय समित्यांवर आपले एकतर्फी वर्चस्व कायम राखले असून, सर्व सहा सभापतीपदांच्या निवडी बिनविरोध झाल्या.

भाजप पक्ष नेतृत्वाने नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांना जबाबदारीची संधी देत विविध समित्यांची धुरा सोपविली आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग समितीच्या सभापतीपदी सद्दामहुसेन शेरीकर, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी कुमारी अपर्णा सिध्दे, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी अविनाश मडीखांबे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी देविदास कवटगी, महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सोनाली शिंदे, तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष ऋतुराज राठोड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

या निवडीसंदर्भात भाजप गटनेते यशवंत धोंगडे यांनी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे शिफारसपत्र सादर केले. आमदार सचिन कल्याणशेट्टी व नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली अक्कलकोट नगरपरिषदेत एकूण २५ पैकी २२ जागांवर भाजपने भक्कम बहुमत प्रस्थापित केले आहे. त्यामुळे सर्व विषय समित्यांवरील नियंत्रण भाजपकडे आले आहे.

या बैठकीत पीठासीन अधिकारी म्हणून मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी कामकाज पाहिले. निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कार्यालयीन अधीक्षक शैलेश बिराजदार, पाणीपुरवठा अधिकारी मनोजकुमार ईश्वरकट्टी, तसेच अमोल भांमरे, अभिषेक काकडे, शुभम माहुरे, धनंजय शेळके यांनी सहकार्य केले.

यावेळी ज्येष्ठ नेते यशवंत धोंगडे, नगरसेवक महेश इंगळे, नन्नू कोरबू, नाविद डांगे, तम्मा शेळके, कांतू धनशेट्टी, स्वीकृत नगरसेवक प्रवीण शहा, तसेच संजय घोडके, अशोक जाधव, मुस्तफा बळोरगी, भागूबाई नागराज कुंभार यांच्यासह मोठ्या संख्येने नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

नवीन सभापतींच्या माध्यमातून शहराच्या विकासकामांना गती मिळेल, तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर अधिक भर दिला जाईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!