महाराष्ट्र

सोलापूर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी स्वच्छतेवर भर द्या!

प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सोलापूर बसस्थानकाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी स्वच्छतेवर भर द्या!

प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

सोलापूर, दि. ३ नोव्हेंबर २०२६ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी स्थानिक प्रशासनाने आवश्यक सुविधांच्या पूर्ततेवर विशेष भर द्यावा, असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी आज दिले.

मंत्री सरनाईक यांनी आज सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन तेथील स्वच्छतागृहे, पाणपोई आणि इतर प्रवासी सुविधांची पाहणी केली. बसस्थानकात झालेल्या सुधारणांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अद्याप सुधारणा करण्यास मोठा वाव असून, बसस्थानक परिसर स्वच्छ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षतेने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

या भेटीदरम्यान मंत्री सरनाईक यांनी बसस्थानकातील प्रवाशांशी थेट संवाद साधला. एसटीच्या नवीन बसेसबाबत प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. भविष्यातही अशीच दर्जेदार सेवा मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी प्रवाशांनी स्थानिक समस्याही मंत्री महोदयांसमोर मांडल्या. दोन मुख्य शहरा दरम्यान विनावाहक सेवा सुरू करण्याची मागणी प्रवाशांनी केली.

प्रवाशांच्या तक्रारी आणि सूचनांची दखल घेत मंत्री सरनाईक यांनी संबंधित एसटी अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

प्रवाशांच्या सोयीसाठी आणि त्यांच्या समाधानासाठी एसटी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रवाशांना उत्तम सुविधा, स्वच्छ बसस्थानके आणि समाधानकारक प्रवास अनुभव देणे हे एसटी महामंडळाचे प्राधान्य आहे. या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी स्थानिक प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहनही मंत्री सरनाईक यांनी केले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!