महाराष्ट्र

राज्यस्तरीय दुखवट्याचा निवडणुकांवर परिणाम; जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या

राज्यस्तरीय दुखवट्याचा निवडणुकांवर परिणाम; जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलल्या

मुंबई | प्रतिनिधी :- राज्यातील १२ जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे जाहीर करण्यात आलेल्या राज्यस्तरीय दुखवट्यामुळे निवडणूक प्रचार व प्रक्रिया प्रभावित झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे यापूर्वी ५ फेब्रुवारीला नियोजित असलेले मतदान दोन दिवसांनी वाढवून ७ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असून, मतमोजणी ९ फेब्रुवारीला होणार आहे. 11 फेब्रुवारी 2026 पर्यंत निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल.

निवडणूक आचारसंहिता निकाल जाहीर होईपर्यंत कायम राहणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!