१५० दिवसांच्या डिजिटल कसोटी चा निकाल येणार…. कोणती शासकीय कार्यालये ठरणार सर्वोत्कृष्ट?
१५० दिवसांच्या डिजिटल कसोटी चा निकाल येणार…. कोणती शासकीय कार्यालये ठरणार सर्वोत्कृष्ट?
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील शासकीय कार्यालयांची कार्यपद्धती अधिक पारदर्शक, गतिमान व नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत विविध १० स्तरांवरील शासकीय कार्यालयांचे मूल्यमापन अंतिम टप्प्यात आले आहे.
या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यातील मूल्यमापनाची जबाबदारी भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India – QCI) यांच्याकडे सोपविण्यात आली असून, डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करणाऱ्या कार्यालयांची निवड केली जात आहे.
कार्यालयांचे मूल्यमापन खालील ७ महत्त्वाच्या निकषांवर करण्यात येत आहे
* कार्यालयाची अधिकृत वेबसाइट
* आपले सरकार प्रणालीचा वापर
* ई-ऑफीस प्रणाली
* कार्यालयाचा डॅशबोर्ड
* व्हॉट्सॲप चॅटबॉट
* कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर
* GIS (भौगोलिक माहिती प्रणाली) चा वापर
या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची राज्यस्तरावर निवड केली जाणार आहे.
या मूल्यमापनातून पुढीलप्रमाणे राज्यातील सर्वोत्कृष्ट कार्यालयांची निवड केली जाणार आहे
जिल्हाधिकारी कार्यालये – ५
पोलीस अधीक्षक कार्यालये – ५
महानगरपालिका कार्यालये – ५
पोलीस आयुक्त कार्यालये – ३
विभागीय आयुक्त कार्यालये – २
पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक कार्यालये – २
राज्यस्तरीय आयुक्तालये / संचालनालये – ७
राज्यस्तरीय मंडळे, महामंडळे, प्राधिकरणे, अभिकरणे, शासकीय/निमशासकीय संस्था व शासकीय कंपन्या – १०
मंत्रालयीन विभाग – ७
या सर्वोत्कृष्ट कार्यालयांची नावे सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता अधिकृतपणे जाहीर करण्यात येणार आहेत.
दरम्यान, आचारसंहिता लागू असल्याने सर्वोत्कृष्ट ५ जिल्हा परिषद कार्यालयांची निवड आचारसंहिता संपल्यानंतर, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा उपक्रम राज्यातील डिजिटल प्रशासन अधिक सक्षम करण्यासोबतच नागरिकांना दर्जेदार व वेगवान सेवा देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.



