महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ : एक मत ठरवणार शहराची पुढील दिशा
मुंबई (प्रतिनिधी):- महानगरपालिका निवडणूक २०२५–२६ अंतर्गत शहरातील नागरिकांसाठी लोकशाहीचा महत्त्वाचा दिवस येऊन ठेपला आहे. “आपलं एक मत ठरविणार आपल्या शहराची दिशा” या संकल्पनेतून येत्या दि. १५ जानेवारी २०२६ रोजी शहरात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही निवडणूक शांततापूर्ण, पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. शहरातील सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सोयीसुविधा, सुरक्षा व्यवस्था तसेच मतदान यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
महानगरपालिका ही शहराच्या विकासाचा कणा मानली जाते. पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य, शिक्षण, नागरी सुविधा तसेच मूलभूत सेवा यांचा कारभार महानगरपालिकेमार्फत चालविला जातो. त्यामुळे या निवडणुकीत नागरिकांनी जागरूक राहून आपल्या हक्काचा मतदानाचा अधिकार बजावणे अत्यंत आवश्यक आहे.
विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांसाठी आयोगाने विशेष व्यवस्था केली आहे. नागरिकांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी आणि आपल्या शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सर्व पात्र मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन प्रशासनासह विविध सामाजिक संघटनांकडून करण्यात येत आहे.
#महानगरपालिका
#निवडणूक_२०२६
#राज्य निवडणूक आयोग
#आपलं मत आपली शहरदिशा


More Stories
मकर संक्रातीला ‘लाडकी बहिणी’ला मोठी भेट? व्हायरल दाव्या मागचं सत्य काय…?
राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषद