Prabuddha Raj

Latest Marathi News

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था सोलापूरच्या २०२६ दिनदर्शिकेचे प्रकाशन; स्व. विवेकानंद लिंगराज यांच्या स्मृतीस अभिवादन

Oplus_16908288

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था सोलापूरच्या २०२६ दिनदर्शिकेचे प्रकाशन; स्व. विवेकानंद लिंगराज यांच्या स्मृतीस अभिवादन

सोलापूर (प्रतिनिधी):- जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पत संस्था नियमित नं. १, सोलापूर यांच्या सन २०२६ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन आज दि. १२ जानेवारी २०२६ रोजी माननीय संदीप कोहीणकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या कार्याची व सामाजिक योगदानाची माहिती देणारी ही दिनदर्शिका सभासदांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

या दिनदर्शिकेमध्ये स्व. विवेकानंद लिंगराज यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले असून, “विवेकानंदाचा शिधा” या संकल्पनेतून त्यांनी जिल्हा परिषद व पतसंस्थेसाठी दिलेल्या योगदानाचा तसेच त्यांनी केलेल्या विविध सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. दिनदर्शिकेत देण्यात आलेल्या QR कोडद्वारे संस्थेचे फोटो, उपक्रम आणि अधिकारी वर्गाचे अभिप्राय पाहता येणार आहेत.

प्रकाशनप्रसंगी संचालक मंडळाने केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करत, ही दिनदर्शिका संस्थेच्या कार्याची ओळख करून देणारी असल्याचे मत माननीय संदिप कोहीणकर यांनी व्यक्त केले. या वेळी संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून, संस्थेचे भागभांडवल १८ कोटी ७१ लाख रुपये, ठेवी ६ कोटी १५ लाख रुपये, तर रिझर्व्ह फंड २ कोटी ८८ लाख रुपये इतका आहे. सभासदांसाठी कर्ज मर्यादा ७ लाख रुपये, तातडी कर्ज मर्यादा ५० हजार रुपये असून व्याजदर ६ टक्के असल्याची माहिती देण्यात आली. सदर दिनदर्शिका सभासदांना मोफत वितरित करण्यात येत आहे.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे व्हा. चेअरमन यांनी स्व. विवेकानंद लिंगराज यांचे “व्हिजन २०४०” पूर्ण करण्याचा निर्धार संचालक मंडळाच्या वतीने व्यक्त केला. यावेळी चेअरमन श्रीमती एस. ई. राऊत यांनी मान्यवरांचे स्वागत केले, तर माजी तज्ञ संचालक श्रीशैल देशमुख यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एस. पी. माने यांनी केले.

या प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री व्ही. व्ही. पाटील, शहाजहान तांबोळी, सुरेश कुंभार, जी. एम. मारडकर, एस. डी. म्हमाणे, टी. ए. मुतवल्ली, एस. एच. राठोड, के. जी. लालवोंद्रे, विशाल घोगरे, तसेच सौ. एम. एस. शिंदे, सी. ए. वाघमारे, आर. आर. घुले, व्ही. एम. घेरडे, व्ही. के. शिंदे, तज्ञ संचालिका डॉ. पी. व्ही. नवले, के. एन. खुर्द, स्वीकृत संचालक, संस्थेचे सचिव डी. एल. देशपांडे, कर्मचारी सुभाष काळे, विनोद कदम आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.