सोलापूर

नागरिकांच्या तक्रारींवर दिरंगाई; सोलापूर महानगरपालिकेची १३ कर्मचाऱ्यांवर कारवाई

सोलापूर ( प्रतिनिधी) :- नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या समस्या नोंदविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने “आपली तक्रार पोर्टल” आणि “माय सोलापूर” मोबाईल अॅपची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण व्हावे, यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्व विभागीय कार्यालयांना अनेकदा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अखेर कारवाईचे हत्यार उगारण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या तक्रार व्यवस्थापन प्रणालीवरील २० नोव्हेंबर २०२५ च्या आढाव्यादरम्यान एकूण ४१ तक्रारी वेळेत निकाली न काढता प्रलंबित ठेवल्याचे आढळले. त्यानुसार विविध विभागांतील १३ कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

दंडित कर्मचाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत:

क्रमांक अधिकारी / कर्मचारी नाव विभाग दंड

1 .प्रशिक बडोळे विभागीय कार्यालय क्र.५ ५,००० रुपये

2. परशुराम बोमकट्टी विभागीय कार्यालय क्र. ५ २,००० रुपये

3 .सुफियान पठाण अतिक्रमण विभाग ५०० रुपये

4. सुरज ढवळे विभागीय कार्यालय क्र.५ ५०० रुपये

5 .संजय पाटील विभागीय कार्यालय क्र.५ ५०० रुपये

6. इरशाद जरतार नगर अभियंता कार्यालय ५०० रुपये

7. इमरान बागवान नगर रचना विभाग ५०० रुपये

8 .प्रमोद गोविंदवार नगर रचना विभाग ५०० रुपये

9 .येशुदास गायकवाड भूमी व मालमत्ता कार्यालय ५०० रु

10 .गणेश काकडे नगर रचना विभाग दंड ५०० रुपये

11. विष्णु कांबळे नगर अभियंता विभाग ५०० रुपये

12. गणेश साखरे नगर अभियंता विभाग ५०० रुपये

13 .हारुण सिद्दीकी नगर अभियंता विभाग ५०० रुपये

उपरोक्त कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ (२)(ड) नुसार ही दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, दंडाची रक्कम नोव्हेंबर २०२५ च्या वेतनातून (डेपॉझिट: डिसेंबर २०२५) थेट वसूल करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

महानगरपालिका प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की :
“तक्रारी वेळेत निकाली काढणे आणि सिस्टम अद्ययावत ठेवणे ही प्रत्येक कर्मचाऱ्याची प्राथमिक जबाबदारी आहे. भविष्यातही अशा प्रकारच्या कारवाया सातत्याने करण्यात येतील.”

नागरिकांनी नोंदविलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष, त्यांची उशीराने नोंदवही अद्ययावत करणे आणि दंड कारवाईच्या दिवशीच तक्रारी पुढे ढकलण्याची प्रवृत्ती हे बाबी निष्काळजीपणाचे लक्षण असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

या कारवाईचे अनेक नागरिकांनी स्वागत केले असून, “नागरिक तक्रार व्यवस्थेला आता उत्तरदायित्व येईल,” अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!