सोलापूर

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; विविध पदांवर एकमताने निवड

दयानंद परिचारक जिल्हाध्यक्ष, मृणाली शिंदे महिला जिल्हाध्यक्षा 

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर; विविध पदांवर एकमताने निवड

दयानंद परिचारक जिल्हाध्यक्ष, मृणाली शिंदे महिला जिल्हाध्यक्षा

सोलापूर :- जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, जिल्हा शाखा सोलापूरची नवी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून कनिष्ठ प्रशासन अधिकारी दयानंद परिचारक यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच विस्तार अधिकारी (सां) मृणाली शिंदे यांची महिला जिल्हाध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. ही निवड जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आली.
संघटनेच्या इतर पदांवर विशाल घोगरे (कनिष्ठ सहायक) यांची जिल्हा उपाध्यक्षपदी, तर शिवाजी राठोड (कनिष्ठ सहायक) यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. महिला विभागात सविता काळे (परिचर) यांची महिला उपाध्यक्षपदी तर स्वाती स्वामी (विस्तार अधिकारी – शिक्षण) यांची महिला कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या निवडीपूर्वी दिवंगत विवेक लिंगराज (सहायक प्रशासन अधिकारी) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथील विसावा सभागृहात बैठक पार पडली. या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड जाहीर करण्यात आली.

निवडीनंतर पुणे विभागीय संघटक डॉ. एस. पी. माने यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना मान्यता देत त्यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. तसेच उर्वरित जिल्हा व तालुका स्तरावरील पदाधिकारी आणि कार्यकारिणीचा विस्तार लवकरच जिल्हाध्यक्ष व सचिव यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस पतसंस्था क्र. 1 चे व्हाईस चेअरमन श्रीधर कलशेट्टी, माजी जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवल्ली, तसेच जिल्हा शाखेचे पदाधिकारी विलास मसलकर, अजय भोसले, राकेश सोडी, संतोष शिंदे, चेतन वाघमारे, श्रीशैल देशमुख, रोहीत घुले, विक्रम शहा उपस्थित होते. याशिवाय लेखा संघटनेचे अध्यक्ष अनिल बिराजदार, राजगुरु, दत्ता घोडके, कटकधोंड, किरण लालबोंद्रे, मिस्त्री, योगेश हब्बु, योगेश खंडागळे, मठपती, म्हेत्रे, सचिन पवार, गुरव, अभिमन्यु कांबळे, नागेश कोमारी यांच्यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते.

तसेच पंढरपूर तालुक्याचे पदाधिकारी शहाजहान तांबोळी, महेश वैद्य, नितीन शिंदे, सतीश ऊनवणे पाटील, कमलेश खाडे यांच्यासह महिला प्रतिनिधी निर्मला राठोड, गोदावरी राठोड, आरती माढेकर, राजगुरु मॅडम व इतर कार्यकारिणी सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष दयानंद परिचारक व इतर पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या माध्यमातून निष्पक्ष, निःस्वार्थ आणि निर्भीडपणे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असा विश्वास व्यक्त केला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!