RTO कार्यालयातील सेवानिवृत्त हेडक्लार्क शिवशरण हरवाळकर यांचे अपघाती निधन

RTO कार्यालयातील सेवानिवृत्त हेडक्लार्क शिवशरण हरवाळकर यांचे अपघाती निधन
सोलापूर :- सोलापूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) मधील सेवानिवृत्त हेडक्लार्क शिवशरण हरवाळकर अप्पा (वय 60) यांचे अपघाती निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच शासकीय वर्तुळात तसेच परिचितांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
शिवशरण हरवाळकर यांनी सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात दीर्घ काळ प्रामाणिकपणे सेवा बजावली होती. आपल्या शांत, मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे ते सहकाऱ्यांमध्ये लोकप्रिय होते. शासकीय सेवेत असताना त्यांनी अनेक जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत नागरिकांना सेवा देण्याचे काम केले.

सेवानिवृत्तीनंतरही ते सामाजिक संपर्कात सक्रिय होते. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार आणि परिचितांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.
शुक्रवार, 6 मार्च रोजी दुपारी चार वाजता त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार आहे.



