महाराष्ट्र

बौद्ध समाजातील संस्थांसाठी पायाभूत सुविधांची अनुदान योजना जाहीर

बौद्ध समाजातील संस्थांसाठी पायाभूत सुविधांची अनुदान योजना जाहीर

सोलापूर,दि. १० (जिमाका) – राज्यातील बौद्ध समाजातील धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या आणि संस्थेमध्ये ५१ टक्क्यांपेक्षा जास्त बौद्ध समाजातील विश्वस्त किंवा सदस्य असलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सन २०२५-२६ या वर्षासाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र संस्थांनी सन २०२५-२६ साठीचे संपूर्ण व परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय (नियोजन शाखा), सोलापूर येथे दि. २० फेब्रुवारी २०२६ पूर्वी सादर करावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, दि. २०/०२/२०२६ नंतर प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांचा कोणताही विचार केला जाणार नाही. त्यामुळे पात्र संस्थांनी अंतिम मुदतीपूर्वी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करावेत, असे जिल्हा नियोजन अधिकारी, सोलापूर तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी दिलीप पवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

या योजनेमुळे बौद्ध समाजातील सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक कार्याला चालना मिळून संस्थांच्या विकासाला बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. शासनाच्या या उपक्रमामुळे समाजातील विविध संस्थांना आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध होऊन सामाजिक प्रगतीस हातभार लागणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!