सोलापूर

सोलापूर महापालिका निवडणूक २०२६ : ईव्हीएम वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी ठिकाणे अधिकृत

सोलापूर महापालिका निवडणूक २०२६ : ईव्हीएम वितरण, स्ट्रॉंग रूम व मतमोजणी ठिकाणे अधिकृत

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी प्रशासनाने तयारीला वेग दिला असून दि. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि दि. १६ जानेवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेसाठी अत्यावश्यक असलेले ईव्हीएम मशीन, मतदान साहित्याचे वितरण व स्वीकृती, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूम तसेच मतमोजणीची ठिकाणे अधिकृत करण्यात आली आहेत.

आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील विविध शासकीय व शैक्षणिक इमारतींमधील खोल्या व खुल्या जागांना यासाठी मान्यता दिली आहे. या ठिकाणांचा वापर मतदान साहित्य वितरण, मतदानानंतर ईव्हीएम मशीन सुरक्षित ठेवणे (स्ट्रॉंग रूम) तसेच मतमोजणीसाठी केला जाणार आहे.

निवडणूक प्रशासनाने प्रभागनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी नियुक्त केले असून त्यांच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आल्या आहेत.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. १ श्री भैरप्पा राजू माळी यांच्याकडे प्रभाग क्रमांक १, २, ३ व ४ ची जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रभागांची मतमोजणी वेलणकर हॉल, दयानंद कॉलेज, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम वेलणकर हॉल येथील रूम नं. १ (पहिला मजला) आणि दयानंद कॉलेजमधील रूम नं. २ मध्ये असेल.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. २ श्रीमती विजया पांगरकर यांच्याकडे प्रभाग क्रमांक ५, ६, ७ व १५ देण्यात आले आहेत. मतमोजणी सेंट्रल लायब्ररी बिल्डिंग, सिंहगड कॉलेज, केगाव येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मॅनेजमेंट बिल्डिंग, तळमजला, सिंहगड कॉलेज येथे राहील.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ३ श्री सचिन इथापे यांच्याकडे प्रभाग क्रमांक ८, ९ व १४ ची जबाबदारी असून मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, सोलापूर येथे होईल. ईव्हीएम स्ट्रॉंग रूम रूम नं. ४ व ५, शासकीय तंत्रनिकेतन येथे असेल.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ४ श्रीमती अंजली मरोड यांच्याकडे प्रभाग क्रमांक १०, ११, १२ व १३ देण्यात आले आहेत. मतमोजणी कुचन प्रशाला कनिष्ठ महाविद्यालय इमारत, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम मातोश्री आशाताई अंबादास सरगम शाळा, रूम नं. ३, नर्सरी स्ट्रॉबेरी, कुचन प्रशाला येथे राहील.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ५ श्री अभिषेक देशमुख यांच्याकडे प्रभाग क्रमांक १६, १७, १८ व २१ असून मतमोजणी विलासचंद मेहता माध्यमिक प्रशाला, जुळे, सोलापूर येथे होणार आहे. ईव्हीएम स्ट्रॉंग रूम याच प्रशालेच्या तळमजल्यावर असेल.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ६ श्री सदाशिव पडदुणे यांच्याकडे प्रभाग क्रमांक १९, २० व २५ देण्यात आले आहेत. मतमोजणी नूतन मराठी विद्यालय, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम नर्सरी फुलपाखरू कलादालन, नूतन मराठी विद्यालय येथे असेल.

निवडणूक निर्णय अधिकारी क्र. ७ श्रीमती जयश्री आव्हाड यांच्याकडे प्रभाग क्रमांक २२, २३, २४ व २६ ची जबाबदारी आहे. या प्रभागांची मतमोजणी शहीद राहुल शिंदे बहुउद्देशीय सभागृह, SRPF कॅम्प, विजापूर रोड, सोलापूर येथे होणार असून ईव्हीएम स्ट्रॉंग रूम देखील याच ठिकाणी असणार आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यांनी निवडणूक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन निवडणूक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!