सोलापूर

कुशल जैन यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा पदभार स्वीकारला

पाणीटंचाई व जलमिशन कामांना देणार प्राधान्य

कुशल जैन यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओपदाचा पदभार स्वीकारला

पाणीटंचाई व जलमिशन कामांना देणार प्राधान्य

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (CEO) कुशल जैन यांनी आज अधिकृतपणे पदभार स्वीकारला. माजी सीईओ कुलदीप जंगम यांची पिंपरी चिंचवड येथे अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली झाल्यानंतर प्रशासनात हा महत्त्वाचा बदल झाला आहे.

पदभार स्वीकारण्यापूर्वी कुशल जैन यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिर येथे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त करताना सांगितले की, “सोलापूर ही संतांची पावन भूमी आहे. पंढरपूर येथील पांडुरंग आणि अक्कलकोट येथील स्वामी समर्थ यांच्या नगरीत सेवा करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. या ठिकाणी माझ्या करिअरची सुरुवात होत असल्याने ही जबाबदारी अधिक महत्त्वाची आहे.”

नवीन जबाबदारी स्वीकारताच कुशल जैन यांनी कामाच्या प्राधान्यक्रमाबाबत स्पष्ट भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील पाणीटंचाईचा प्रश्न सोडविणे हे सर्वोच्च प्राधान्य असेल. तसेच, ग्रामीण भागात सुरू असलेल्या जल मिशन अंतर्गत कामांचा आढावा घेऊन ज्या ठिकाणी अडचणी आहेत, त्या दूर करण्यावर भर दिला जाईल, असे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, माजी सीईओ कुलदीप जंगम यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेच्या कामकाजात गती आणत विविध विकासकामांना चालना दिली होती. त्यांच्या कामाची छाप प्रशासनावर उमटली असून, आता त्या कामाचा वारसा पुढे नेण्याचे मोठे आव्हान कुशल जैन यांच्यासमोर आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!