सोलापूर

गटशिक्षणाधिकारी आरबाळे पुन्हा अडचणीत; तिसऱ्या कारणे दाखवा नोटीसीने वाढली धसकी

सोलापूर (प्रबुध्द राज न्युज) :-अक्कलकोट पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांच्या विरोधातील प्रशासकीय कारवाईची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. सलग तीन कारणे दाखवा नोटिसा बजावल्याने त्यांची कारकीर्द आता टोकावर असल्याची चर्चा शिक्षण विभागात आणि स्थानिक वर्तुळात जोरात आहे.

नव्या नोटीसीत कर्तव्यात कसूर, चौकशीत निष्क्रियता आणि आदेशांची अवहेलना केल्याचा गंभीर ठपका ठेवण्यात आला असून, पुढील कारवाईची टांगती तलवार आरबाळे यांच्या डोक्यावर आहे.

शिक्षण विभागाकडून देण्यात आलेल्या नोटिसांचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे:

१ .शिक्षक समायोजन प्रक्रियेत त्रुटी पहिली नोटीस

२ .रिक्त पदांची चुकीची सूचना देऊन वरिष्ठांची दिशाभूल दुसरी नोटीस

३ .शिक्षक भरती चौकशीत निष्क्रियता आणि कर्तव्यात कसूर तिसरी नोटीस (आत्ताची)

या सर्व प्रकरणांनी आरबाळे यांच्या प्रशासनातील भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.

कामती येथील नागरिकाने शिक्षक भरतीत बोगस कागदपत्रांचा वापर व अनियमितता झाल्याची तक्रार एप्रिल महिन्यात जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे केली होती. १६ सप्टेंबर २०२५ रोजी चौकशी आदेश,कागदपत्रांची मागणी,सात दिवसांची मुदत हे निर्देश देण्यात आले होते मात्र दोन महिन्यांहून अधिक काळ उलटूनही कोणतेही ठोस पाऊल न उचलल्याने विभागाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

Oplus_16908288

“आपण महाराष्ट्र जिल्हा परिषद कर्मचारी सेवा नियम १९६७ मधील वर्तन नियमांचे उल्लंघन केले असून आदेश असूनही चौकशीस विलंब केला. ही कर्तव्यातील कसूर समजली जाईल.”

असे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.
तसेच आवश्यक कागदपत्रे न सादर करणे,चौकशी अधिकारी नियुक्तीमध्ये विलंब,आदेशांकडे दुर्लक्ष,
हे मुद्देही नोटीत ठळकपणे नमूद आहेत.

आरबाळे यांनी सात दिवसांच्या आत लेखी स्पष्टीकरण आणि संबंधित चौकशी अहवाल सादर करणे बंधनकारक असून, तसे न केल्यास विभागाने स्पष्ट केले आहे की: “आपल्याविरुद्ध शिस्तभंगाची कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल.”

शिक्षक भरतीसारखे संवेदनशील प्रकरण प्रलंबित ठेवणे आणि आदेशांकडे दुर्लक्ष केल्याने आरबाळे यांच्या कार्यशैलीवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. विभागातील काही कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यानुसार:

“प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता, यापुढे बदली किंवा निलंबनासहित कडक कारवाईची शक्यता नाकारता येत नाही.”

ही तिसरी नोटीस असल्याने आता विभाग कोणती कारवाई करतो आणि आरबाळे यांचे स्पष्टीकरण कितपत समाधानकारक ठरते, याकडे शिक्षण क्षेत्र, शिक्षक संघटना आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सलग नोटिसा, विलंब, अनियमितता आणि चौकशीतील उदासीनता — या सर्वांनी प्रशांत आरबाळे यांची स्थिती धोकादायक टप्प्यावर पोहचली असून, ही नोटीस त्यांच्या सेवेतील निर्णायक वळण ठरू शकते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!