सोलापूर

जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

जिजाऊ जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत रक्तदान शिबीर व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

सोलापूर (प्रतिनिधी):- मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर तसेच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा उद्या सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. कुलदीप जंगम (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सोलापूर यांच्या शुभहस्ते होणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक श्री. चंद्रशेखर जगताप,
जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्रीमती मिनाक्षी वाकडे,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संदीप कोहिणकर,
तसेच उप मुख्य कार्यकारी अधिकारी (प्र) श्रीमती स्मिता पाटील उपस्थित राहणार आहेत.

याशिवाय जिल्हा परिषदेतील सर्व सन्माननीय अधिकारी व कर्मचारी यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.

हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद सोलापूर येथे पार पडणार असून, जिजाऊ मातांच्या विचारांचा जागर करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा उपक्रम असल्याचे आयोजकांनी सांगितले.

रक्तदानासारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमासोबतच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाला प्रेरणादायी व्यासपीठ देण्यात येणार आहे.

Oplus_16908288
दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!