स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज राज्य निवडणूक आयुक्तांची महत्त्वाची पत्रकार परिषद
मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण माहिती देण्यासाठी आज, सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजता मा. राज्य निवडणूक आयुक्त श्री. यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ही पत्रकार परिषद मुंबईतील मलबार हिल येथील सह्याद्री अतिथिगृह येथे होणार असून, यामध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक, निवडणूक प्रक्रिया, आरक्षण, आचारसंहिता तसेच निवडणूक पारदर्शकतेबाबत महत्त्वाचे निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. यांच्या वतीने आयोजित या पत्रकार परिषदेत राज्यभरातील वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात अनेक महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित असून, या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद राजकीय व प्रशासकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. सहायक आयुक्त (जनसंपर्क) डॉ. जगदीश मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे माध्यमांना उपस्थित राहण्याची विनंती केली आहे.
आजच्या पत्रकार परिषदेकडे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार तसेच नागरिकांचे लक्ष लागले असून, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



