महाराष्ट्र

राष्ट्रगीताने नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ संस्थगित; पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत

राष्ट्रगीताने नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ संस्थगित; पुढील अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबईत

नागपूर (प्रतिनिधी ):- महाराष्ट्र विधिमंडळाचे नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२५ राष्ट्रगीताने विधिवत संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार, दि. २३ फेब्रुवारी २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची अधिकृत घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत केली.

नागपूर येथे झालेल्या या हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे एकूण ७ दिवस कामकाज झाले. या कालावधीत ७२ तास ३५ मिनिटे प्रत्यक्ष कामकाज पार पडले, तर अन्य कारणांमुळे केवळ १० मिनिटे वेळ वाया गेला. अधिवेशनातील दररोजचे सरासरी कामकाज १० तास २२ मिनिटे इतके राहिले, जे कार्यक्षमतेचे निदर्शक मानले जात आहे.

अधिवेशन काळात सभागृहात १२ शोक प्रस्ताव मांडण्यात आले.
तारांकित प्रश्नांच्या बाबतीत एकूण ७,२८६ प्रश्न प्राप्त झाले असून त्यापैकी २१५ प्रश्न स्वीकृत करण्यात आले. यातील २७ प्रश्नांना उत्तरे देण्यात आली. या उत्तरांमधून उद्भवलेल्या २३ सूचनांपैकी १९ स्वीकृत करण्यात आल्या, तर २ सूचनांवर चर्चा झाली.

सार्वजनिक महत्त्वाच्या बाबींवर १६० सूचना प्राप्त झाल्या असून त्यापैकी ६९ सूचना मान्य करण्यात आल्या. अधिवेशनात सहा अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात आले, तसेच सहा अध्यादेश नापसंत करण्यात आले.

शासकीय विधेयकांच्या बाबतीत विधानसभेत १८ विधेयके पुनर्स्थापित, तर १६ विधेयके संमत करण्यात आली. विधानपरिषदेकडून ४ विधेयकांना संमती देण्यात आली.
अशासकीय विधेयकांमध्ये २१ सूचना प्राप्त, ८ मान्य, तर ८ विधेयके पुनर्स्थापित करण्यात आली.

लक्षवेधी सूचनांबाबत एकूण १,८६७ सूचना प्राप्त झाल्या, त्यापैकी २९९ स्वीकृत, तर ७० सूचनांवर चर्चा झाली.
नियम ९७ अंतर्गत २७ सूचना प्राप्त झाल्या; मात्र एकही सूचना मान्य किंवा चर्चेसाठी आली नाही.
नियम २९३ अंतर्गत २ प्रस्ताव प्राप्त, २ मान्य आणि दोन्ही प्रस्तावांवर चर्चा झाली.
अशासकीय ठरावांमध्ये २२० सूचना प्राप्त, तर २६२ ठराव मान्य करण्यात आले.

सदस्यांच्या उपस्थितीचा विचार करता, अधिवेशनात कमाल उपस्थिती ९०.९८ टक्के, किमान उपस्थिती ४३.८५ टक्के, तर एकूण सरासरी उपस्थिती ७५.९४ टक्के इतकी नोंदविण्यात आली.

दरम्यान, बंकिमचंद्र चॅटर्जी लिखित वंदे मातरम् या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त विधानसभेत वंदे मातरम् या संपूर्ण गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. या भावनिक व राष्ट्रभावनेने ओतप्रोत वातावरणात अधिवेशनाचा समारोप झाला.

एकूणच, नागपूर हिवाळी अधिवेशन २०२५ हे कामकाजाच्या दृष्टीने फलदायी ठरले असून, विधिमंडळाच्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवणारे अधिवेशन म्हणून याची नोंद घेतली जात आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!