महाराष्ट्र

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन; ९० व्या वर्षी अखेरचा श्वास

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे वृद्धापकाळाने निधन; ९० व्या वर्षी अखेरचा श्वास

लातूर (प्रतिनिधी) :- काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज पहाटे निधन झाले. ते ९० वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. उपचार सुरू असताना त्यांनी अंतिम श्वास घेतला. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशाचे एक अनुभवी, शांत, शिस्तप्रिय आणि तत्त्वनिष्ठ नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Oplus_16908288

शिवराज पाटील चाकूरकर यांनी जवळपास पाच दशकांचा राजकीय प्रवास केला. त्यांच्या कारकिर्दीत
ते लोकसभा अध्यक्ष,केंद्रीय गृहमंत्री,महाराष्ट्राचे गृहमंत्री,काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य,
अशा अनेक महत्वाच्या पदांवर कार्यरत होते. देशाच्या संसदीय लोकशाहीमध्ये त्यांनी शिस्त, संयम आणि सभागृहातील उच्च दर्जाची परंपरा जोपासली.

लोकसभेच्या अध्यक्षपदावर असताना त्यांनी संसदेतील शिस्त, नियम व संसदीय परंपरा टिकवून ठेवण्यासाठी अनेक नवे उपक्रम राबवले. त्यांचे निर्णय व कार्यपद्धती आजही एक आदर्श म्हणून पाहिले जातात. शांत, साधेपणा आणि प्रामाणिक राजकारण यासाठी ते विशेष ओळखले जात.

Oplus_16908288

लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे त्यांचे मूळ घर असून ग्रामीण भागातील विकासकामांसाठी त्यांनी नेहमीच तत्परतेने प्रयत्न केले. शेतकरी, गरीब व सामान्य माणसांच्या प्रश्नांसाठी ते सदैव आवाज उठवत. त्यामुळेच ते सर्वस्तरांत आदराचे स्थान मिळवून होते.

शिवराज पाटील यांच्या निधनानंतर देशभरातून शोकसंदेशांचा ओघ सुरु आहे. काँग्रेस नेते, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. “मृदू भाषी, तत्वनिष्ठ आणि संयमी राजकारणी” म्हणून त्यांची आठवण कायम राहील, अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार चाकूर येथे करण्यात येणार आहेत. कुटुंबीय, राजकीय सहकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील अशी माहिती आहे.

देशाच्या राजकारणातील एक प्रदीर्घ, तत्त्वनिष्ठ आणि संयमी अध्याय आज संपुष्टात आला. शिवराज पाटील चाकूरकर यांना ‘दैनिक प्रबुद्ध राज ’तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!